Thu, Jul 18, 2019 10:08होमपेज › Pune › महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी योगेश मुळीक

महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी योगेश मुळीक

Published On: Mar 07 2018 12:39PM | Last Updated: Mar 07 2018 12:27PMपुणे : प्रतिनिधी

पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक योगेश मुळीक यांची बुधवारी बहुमताने निवड झाली. मुळीक यांना दहा तर राष्ट्रवादीच्या उमेदवार लक्ष्मी दुधाने यांना पाच मते पडली.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपकडून योगेश मुळीक तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून लक्ष्मी दुधाने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निवडणूक झाली.  पिठासीन अधिकारी शेखर गायकवाड यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा अवधी दिला. 

या कालावधीत एकाही उमेदवाराने अर्ज माघारी न घेतल्याने मतदान घेण्यात आले. त्यात मुळीक यांना 10 तर दुधाने यांना 5 मते पडली. सेनेच्या सदस्य संगीता ठोसर या निवडणुकीसाठी अनुपस्थित राहिल्या. मतदानानंतर  पिठासन अधिकारी गायकवाड यांनी मुळीक यांची बहुमताने निवड झाल्याचे जाहीर केले.  या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी पालिका भवनात मोठा जल्लोष केला.