Sun, Jul 21, 2019 14:08होमपेज › Pune › अन् घरात पाणी येतं म्‍हणून त्‍यांनी घरच उचललं!(Video)

अन् घरात पाणी येतं म्‍हणून त्‍यांनी घरच उचललं! (Video)

Published On: Jul 11 2018 5:27PM | Last Updated: Jul 11 2018 5:28PMमुंढवा (पुणे) : वार्ताहर

घर म्‍हणजे चार भिं'तीपुरतचं मर्यादीत नसत तर त्‍या घरातील प्रत्‍येक सदस्‍यांसाठी ते एक विश्व असत. त्‍यामुळे घराविषयी प्रत्‍येकाच्या मनात एक हाळवा कोपरा असतो. अशाच एका व्यक्‍तीने आपल्‍या घराभोवतीचा रस्‍ता उंच झाल्‍याने आपल्‍या घराचीच उंची वाढवण्याचा अनोखा प्रयोग केला आहे. त्‍यांचा हा प्रयोग परिसरातील नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

बिटी कवडे रोड वरील तारादत्‍त कॉलनीमध्ये शिवकुमार भारव्दाज यांच घर आहे. भारव्दाज यांच्या घरासभोवतालच्या परिसरात गेल्‍या काही वर्षात विकासकामे झाली. यामध्ये रस्‍त्‍यांची उंची वाढविण्यात आली. मात्र रस्‍त्‍यांची उंची वाढत गेल्‍याने भारव्दाज यांच्या घराची उंची रस्‍त्‍याच्या खाली गेले. यामुळे पावसाचे व गटाराचे पाणी पावसाळ्‍यात थेट घरात शिरू लागले. यावर आपले हक्‍काचे घर तरी सोडून जाउ शकत नाही. मग करायचे काय. यावर भारव्दाज यांनी एक अनोखी शक्‍कल लढवली. त्‍यांनी रस्‍त्‍यापेक्षा आपल्‍या घराचीच उंची वाढविण्याचा विचार केला आणि त्‍यासाठी त्‍यांनी याविषयी इंटरनेटवर थोडे सर्च करून असे काम करणार्‍या एका कंपनीची माहिती मिळवली. यानंतर संबधित कंपनीशी संपर्क साधून या कंपनीला पुण्यात बोलवले. 

कंपनीने या घराची संपूर्ण पाहणी करत, घर उचलायच्या कामाला सुरूवात केली. या कामासाठी तब्‍बल २० कामगार काम करत असुन गेल्‍या महिना भरापासून हे काम सुरू आहे. या कामाचं वैशिष्‍टय म्‍हणजे सुमारे दोन हजार स्वेअर फुट घराचा पाया कापून जागोजागी जॅक लावून घर चार फुटाने उचलण्यात आले आहे. हे घर उचलण्यासाठी जवळपास २०० जॅक लावण्यात आले आहे. अजून १५ दिवस हे काम सुरू राहणार असून यानंतर त्याच्या खाली नव्याने विटा रचल्या जाणार आहेत. यामुळे हे घर रस्‍त्‍यापेक्षा उंच होणार आहे. यामुळे भारव्दाज यांच्या घरात येणार्‍या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. मात्र, घर उचलण्याचा हा महाराष्‍ट्रातील पहिलाच प्रयोग सांगितला जात आहे. अशा प्रकारचा हा अनोखा प्रयोग कुतुहलापोटी नागरिकांची गर्दी होत आहे.