Thu, Aug 22, 2019 10:12होमपेज › Pune › 'राजकारण करायचे असेल तर हांजी-हांजी करावी लागते'

'राजकारण करायचे असेल तर हांजी-हांजी करावी लागते'

Published On: May 20 2018 6:31PM | Last Updated: May 20 2018 6:31PMपुणे : प्रतिनिधी

कर्नाटकच्या निवडणुकीत सत्तेसाठी सुरू असलेली पक्षांची खेळी सार्‍या देशाने पाहिली. यानंतर आता पक्षांतर्गत असणारी नाराजीही समोर येत आहे. राज्यातल्या एका ज्येष्ठ नेत्याने जाहीर कार्यक्रमात आता हांजी-हांजीच्या या राजकारणाला कंटाळल्याची कबुली देत राजकारण सोडून शेती करण्याची इच्छा बोलून दाखविली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर मित्र पक्षाच्या नेत्यांनी त्यांना सबुरीचा सल्ला देत तुमचे भविष्य उज्वल्ल असल्याचे सांगितले. त्यानंतर सभागृहात एकच हश्या पिकला. परंतु, त्या नेत्याचे हे बोलने नेमके पक्षांतर्गत नाराजीतून होते, की मंत्री असताना काहीच करता येत नसल्याची खंत होती, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. 

पुण्यात पशुसंवर्धन विभागाच्या वर्धापनदिनानिमित्त आज रविवारी पशुपालक महामेळावा आणि राज्यस्तरीय आभासी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. सामाजिक न्याय राज्‍य मंत्री दिलीप कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्‍थित  होते. यावेळी व्यासपीठावर दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची ही प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणुन बोलताना कांबळे म्हणाले, राजकारणात आपला नेता यशस्वी व्हावा यासाठी कार्यकर्ते जिवाचे रान करतात., तेव्हा कुठे नेता आमदार, खासदार, किंवा स्थानिक स्वाराज्य संस्थेत विजयी होतो. परंतु, जेव्हा राज्याचा राज्यमंत्री असताना आपण राजकरणातून निवृत्त होऊन शेती करायची भाषा करतो तेव्हा, मात्र, राजकारण कोणत्या स्तराला गेले असावे याचा अंदाज येईल. सामाजिक न्याय राज्‍यमंत्री दिलीप कांबळे यांनी आताच्या राजकरणात हांजी-हांजी करावी लागते, हे स्पष्ट पणे सांगताच व्यासपिठावर असलेल्या महादेव जानकर यांनी कांबळे यांना  मध्येच थांबवत राजकारणात तुमचे भविष्य उज्‍वल आहे, त्यामुळे राजकारणापासून दूर जाण्याचा विचार करु नका, असा सल्ला दिला. त्यानंतर सभागृहात हश्या पिकला.  

१९७२ च्या दुष्काळात माझं कुटुंब सोलापूर जिल्ह्यातून पुण्यात आले. त्यानंतर शिक्षण घेताना विद्यार्थी परिषदेत आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघात काम केले. त्यानंतर भारतीय जनता पक्षात काम केल. पुण्यात येण्यापूर्वी गावाकडे शेळ्या राखण्यापासून सर्व कामे केली. आज हे सर्वकरून आल्यानंतर जेव्हा राज्याचा मंत्री आहे. तरीही मनात कुठेतरी राजकरणात पुर्वीसारखे दिवस राहिले नाहीत असे वाटते. आता राजकारण करायचे असेल तर हांजी-हांजी करावी लागते. त्यामुळे कुठेतरी दोन-चार एकर शेती घेऊन शेती करत रहावे, असा विचार करत असल्याचे कांबळे यांनी कार्यक्रमात स्‍पष्‍टपणे सांगताचं या विधानावरून उपस्‍थितांमध्ये एकच चर्चा रंगली.