Mon, Mar 25, 2019 05:34
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › मेट्रो स्टेशनला मावळ्यांच्या पगडीचा लूक

मेट्रो स्टेशनला मावळ्यांच्या पगडीचा लूक

Published On: Sep 02 2018 1:39AM | Last Updated: Sep 02 2018 1:25AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे मेट्रो प्रकल्पातील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट (रिच 1) आणि वनाज ते रामवाडी (रिच 2) या 31.5 किलोमीटरच्या मार्गामध्ये एकूण 30 मेट्रो स्टेशन असणार आहेत. कमीत कमी अंतरांवर असणार्‍या स्टेशनमुळे शहराच्या वाहतूक कोंडीच्या समस्येचर तोडगा निघणार आहे. सध्या मेट्रो मार्गांसह स्टेशनचे कामही आता सुरू झाले असून पुण्याच्या मातीशी नाळ जोडण्यासाठी या स्टेशनला मावळ्यांच्या पगडीचा लूक देण्यात येणार आहे.

रिच 1 आणि रिच 2 या दोन्ही मार्गांमध्ये मिळून एकुण 30 मेट्रो स्टेशन्स असणार आहेत. रिच 1 च्या मेट्रो मार्गात 14 स्टेशन्सपैकी 5 स्टेशन्स हे भुयारी तर 9 स्टेशन्स हे उन्नत असणार आहेत. रिच 2 च्या मार्गात 16 स्टेशन्स हे उन्नत असतील. प्रवाशांच्या सोयीसाठी ही सर्व स्टेशन्स शहरातील इतर प्रवासी वाहतूक व्यवस्था रिक्षा, रेल्वे, पीएमपीएमएल आदींना जोडून घेण्यात येणार आहेत. 

सध्या रिच 1 आणि रिच 2 या दोन्ही मार्गांवरील स्टेशन्सच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. यातील भुयारी मार्गांच्या स्टेशन्सच्या कामातील बोगदे तयार करण्याचे काम पुढील वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहे.