Wed, Mar 27, 2019 02:13होमपेज › Pune › यांत्रिकीकरणाचे 50 कोटींहून अधिक अनुदान अर्जाविना पडून

यांत्रिकीकरणाचे 50 कोटींहून अधिक अनुदान अर्जाविना पडून

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 14 2018 1:16AM

बुकमार्क करा
पुणे :  प्रतिनिधी

राज्य शासनाने ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ या योजनेंतर्गत खरीप हंगामासाठी अनुसूचित जाती आणि जमातींतील शेतकर्‍यांसाठी कृषी यंत्रे आणि अवजारे खरेदीसाठी संबंधितांकडून योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे  योजनेचा कृषी खात्याकडे असलेला निधी वापराअभावी पुन्हा शासनाकडे परत जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संबंधितांनी पूर्वसंमतीने अवजारे खरेदी करून अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे, अशी रक्‍कम पन्नास कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात आले.

राज्यातील अनुसूचित जाती आणि जमातींच्या लाभार्थी शेतकर्‍यांकडून यांत्रिकीकरणाच्या योजनेतील सहभागासाठी बहुतांश जिल्ह्यांमध्ये अर्ज करण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. अर्ज न आल्यास निधी राज्य सरकारकडे परत केला जाणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये अर्ज आले आहेत. त्यांना पूर्वसंमती देण्यात आल्यानंतरही अवजारे खरेदी करून अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे संबंधित शेतकर्‍यांनी मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांची कार्यालये किंवा कृषी सहाय्यकांमार्फत अर्ज करून अनुदानासाठी प्रस्ताव द्यावेत. अनुदानाची रक्‍कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  कृषी विभागाच्या हीींिं://ज्ञीळीहळ.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप  या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना, कृषी अवजारांची माहिती, अनुदान मर्यादा आदी माहिती देण्यात आली आहे. संबंधित शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.