होमपेज › Pune › पुण्यातील सर्व शाळा कॉलेज गुरुवारी बंद राहणार 

पुण्यातील सर्व शाळा कॉलेज गुरुवारी बंद राहणार 

Published On: Aug 08 2018 5:00PM | Last Updated: Aug 08 2018 5:00PMपुणे : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चाकडून गुरूवारी दि ९/०८/२०१८ रोजी पुणे बंदची घोषणा करण्यात आली आहे. त्‍या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या कारणाने सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जाहीर केला आहे. 

उद्या गुरुवारी राज्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंदची घोषणा करण्यात आली आहे.  त्या पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. त्‍यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये गुरूवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.