Thu, Jun 27, 2019 02:26होमपेज › Pune › दाभाडे टोळीतील मराठेचा जामीनासाठी अर्ज

दाभाडे टोळीतील मराठेचा जामीनासाठी अर्ज

Published On: Dec 02 2017 2:09AM | Last Updated: Dec 02 2017 1:23AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी 

तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन बाळासाहेब शेळके (38) यांचा गोळ्या घालून निर्घृण खून केल्याप्रकरणी दाभाडे टोळीच्या एकाने न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. त्याच्या जामीन अर्जाला सरकारी पक्षाने जोरदार विरोध केला असून त्याच्या जामिनावरील निर्णय 6 डिसेंबर रोजी होणार आहे. याप्रकरणात 20 आरोपींवर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.  

गुरूदेव रमेश मराठे (28. रा. वराळे ता. मावळ जि. पुणे) असे जामिनासाठी धाव घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात बंटी उर्फ शंकर रामचंद्र दाभाडे (35), संदिप सोवपान पचपिंड (30), खंडू उर्फ पप्पू दत्तात्रय पचपिंड (30), आकाश दीपक लोखंडे (21), रूपेश सहादू घारे (25), राजेश दादाभाऊ ढवळे (30), शिवाजी भरत आढाव (24),  अमित अनिल दाभाडे (23), सचिन लक्ष्मण ठाकर (26),  देवानंद उर्फ देवीदास विश्‍वनाथ खर्डे, नितीन शिवाजी वाडेकर (22), दत्ता ज्ञानेश्‍वर वाघोले (22), सुरज विलास गायकवाड (22), अभिषेक उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्‍वर मारूती गायकवाड, अजय राजाराम हिंगे, पिंट्या उर्फ बाळू दत्तात्रय सांडभोर (33), अमोल अनिल लांढे (21), मॉन्टी उर्फ संकेत जगदीश नानेकर, पंकज कृष्णाजी आवटे (28) यांच्यावर कट करून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळीचा म्होरक्या शाम रामचंद्र दाभाडे, धनंजय प्रकाश शिंदे उर्फ तांबोळी यांचा मृत्यू झाला आहे.   
 

   मृत श्याम दाभाडे हा सराईत गुन्हेगार असून तो टाळीचा म्होरक्या होता तर इतर आरोपी टोळीचे सदस्य आहेत. या टोळीला आर्थिक फायद्यासाठी संघटीत होऊन गंभीर गुन्हे करण्याची सवय आहे. मृत सचिन शेळके यांचा तळेगाव एमआयडीसी परिसरात पाणी पुरवठा आणि खडी सप्लाय करण्याचा व्यवसाय होता. टोळीकडून माजी नगराध्यक्ष शेळके यांच्याकडे हप्ता मागितला जात होता. परंतु, शेळके यांचा हप्ता देण्यास विरोध होता. तसेच ते टोळीलाही जुमानत नव्हते. 2013 मध्ये सचिन शेळके यांना पैशासाठी जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होत. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला होता. याच कारणावरून श्याम दाभाडे याने आपल्या साथीदाराच्या मदतीने कट रचला. तळेगाव स्टेशन रस्त्यावरील खांडगे पेट्रोल पंपासमोर 16 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शेळेक कारमधून जात होते. त्यावेळी टोळीतील एकाने त्याच्या कारला धडक दिली.

यामुळे सचिन शेळके यांनी त्यांची कार थांबविली. त्यानंतर शेळके कारच्या बाहेर येताच त्यांना दांडक्याने मारहाण करून, धारधार हत्यारांनी वार करून तसेच गोळ्या झाडून त्याचा निर्घृण खून केला होता. त्यानंतर आरोपी खून करून फरार झाले होते. याप्रकरणी मराठे यालादेखील अटक झाली होती. या प्रकरणात आपल्याला जामीन मिळावा यासाठी मराठेने न्यायालयात अर्ज दाखल केला. त्याला अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी विरोध केला. आरोपींनी कट करून खून केला आहे. कटात मराठेचाही सहभाग आहे, यातील काही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात एक जण फरार आहे. मराठेला जामिनावर सोडल्यास तो गुन्हे करण्याची शक्यता आहे. टोळीची तळेगाव  परिसरात दहशत असून तो साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्याने अ‍ॅड. कावेडीया त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी केली आहे.