Sat, Feb 23, 2019 15:05होमपेज › Pune › मराठा आरक्षण लवकरच सर्वेक्षण

मराठा आरक्षण लवकरच सर्वेक्षण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे :  प्रतिनिधी

सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज किती मागासलेला आहे, हे पाहण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच बैठकीत झाला.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्याने उच्च न्यायालयात दाखल केलेले मुद्देच सरकारकडून आयोगाला सादर करण्यात आले आहेत. ते पडताळून पाहण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. आरक्षण देण्यासाठी आवश्यक सर्वेक्षण करण्याचा अधिकार आयोगाला असून त्या अनुषंगाने सर्वेक्षण होईल. ही माहिती संकलित करण्यासाठी वेळप्रसंगी संशोधन करणार्‍या संस्थांची मदत घेतली जाईल, असे बैठकीत ठरले.

यापूर्वी मागासवर्गीय आयोगाने  अनेकवेळा  मराठा समाज आरक्षणाची मागणी फेटाळून लावली होती. मात्र, बुधवारच्या बैठकीत आयोगाने सकारात्मक विचार केला. बैठकीला डॉ. सर्जेराव निमसे, चंद्रशेखर देशपांडे, डॉ. राजाभाऊ करपे, भूषण कर्डिले, डॉ. दत्तात्रय बाळसराफ, डॉ. सुवर्णा रावळ, डॉ. प्रमोद येवले, सुधीर ठाकरे आणि रोहिदास जाधव उपस्थित होते.