Wed, Sep 26, 2018 20:37होमपेज › Pune › मराठा लाईट इन्फ्रंट्रीचा 250 वा स्थापना दिन सोहळा

मराठा लाईट इन्फ्रंट्रीचा 250 वा स्थापना दिन सोहळा

Published On: Feb 11 2018 1:35AM | Last Updated: Feb 11 2018 1:31AMपुणे : प्रतिनिधी

लष्करातील मानाच्या व नावाजलेल्या मराठा लाईट इन्फ्रंट्रीच्या 250व्या स्थापना दिनानिमित्त काळी पाचवी या बटालियनतर्फे आयोजित कार्यक्रमांना दिमाखात प्रारंभ झाला आहे. औंध येथील लष्करी तळावर हे कार्यक्रम रंगत असून, रविवारी  त्याची सांगता होणार आहे. शनिवारी (दि. 10) पागल जिमखाना व बडाखानाचे आयोजन करण्यात आले होते. तर रविवारी (दि. 11) वीरमाता व वीरपत्नींचा सत्कार, तसेच मराठा टॅटू या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

काळी पाचवीच्या ऑफिसर्स मेसमध्ये होणार्‍या खास मेजवानीने या कार्यक्रमांची सांगता होणार आहे. लेफ्टनंट जनरल झाकी (निवृत्त) म्हणाले की, अत्यंत चपळ, कार्यकुशल, व्यावसायिक व धाडसी सैनिकांच्या कर्तृत्वावरच या तुकडीने नावलौकिक प्राप्त केला आहे. भविष्यातही ही तुकडी भारतीय लष्कराचे नाव उंचावेल. काळी पाचवीमध्ये काम करतानाच मी या तुकडीचे नेतृत्वही केले आहे.