Thu, Jul 18, 2019 21:41होमपेज › Pune › माळशेज घाटात दरड कोसळली, वहातू बंद

माळशेज घाटात दरड कोसळली, वहातू बंद

Published On: Jul 17 2018 4:15PM | Last Updated: Jul 17 2018 4:15PMओतूर : प्रतिनिधी 

नगर कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात पुन्हा  दरड कोसळली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आलेला दगडमातीचा ढीग हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आसून वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

घाटात जोरदार पाऊस व दाट धुके असल्‍याने आणि दरड कोसळण्याचे सत्र सुरू असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव  आज दिवसभर घाट वहातुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. घटनास्थळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. नेमकी  किती कालावधीसाठी घाटातील वहातूक बंद ठेवण्यात आली आहे याबाबत पुरेशी माहिती मिळू शकलेली नाही.

घाट बंद असल्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची मात्र यामुळे अडचण झाली आहे. ओतूर, नारायणगाव, चाकण, तळेगाव , लोणावळा मार्गे वहातूक मुबंईकडे  वळविण्यात आली आहे.