Thu, Apr 25, 2019 23:59होमपेज › Pune › लोकसभा निवडणूक वॉर्डाच्या निवडणुकीपेक्षा सोपी : पवार

लोकसभा निवडणूक वॉर्डाच्या निवडणुकीपेक्षा सोपी : पवार

Published On: May 01 2018 5:44PM | Last Updated: May 01 2018 5:44PMपुणे : प्रतिनिधी

लोकसभेमध्ये निवडून येण हे वार्डामध्ये निवडून येण्याच्या मानान सोपं आहे. मात्र, सतत तीस वर्ष वार्डातुन निवडून येणं कठीण असते. नागरिक सहजासहजी एकांच नगरसेवकावर इतके वर्ष विश्वास ठेवत नाहीत. मात्र, आबा बागुलांनी नागरिकांचा विश्वास आपल्या कामातून संपादन केला आहे. अवकाशातील रचना, वातानुकूलित यंत्रणा, अवकाशातील ग्रहण अशा आधुनिक तारांगणाची निर्मिती आबा बागुल यांनी केली आहे. पुण्यातील हे तारांगण अभ्यासक, विध्यार्थी आणि नागरिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. मला तारांगणाच्या उदघाटन समारंभाकरिता उपस्थित राहण्याची इच्छा होती. तळपायाला इजा झाल्यामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही. डॉक्टरांनी मला सक्तीची रजा घ्यायला लावली, असे भावपूर्ण उद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले.

नगरसेवक आबा बागुल यांच्या संकल्पनेतून पुणे महानगरपालिकेतर्फे विलासराव देशमुख थ्री-डी तारांगणाच्या उदघाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी केंद्रीय कृषिमंत्री, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची ध्वनीचित्रफीत उदघाटन सोहळ्या प्रसंगी दाखविण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री गिरीश बापट, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, महापौर मुक्ता टिळक, खासदार सुप्रिया सुळे, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार अमित देशमुख, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अंकुश काकडे, शहराध्यक्ष रमेश बागवे, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार, पालिका आयुक्त सौरव राव उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, आजचा दिवस कामगारदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला महाराष्ट्रामध्ये महत्व आहे. या दिवशी विलासराव देशमुखांच्या नावाने तारांगण नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. विलासराव देशमुख आगळ्या-वेगळ्या प्रकारच वृक्ष होत. विलासरावांनी लोकांचा विश्वास संपादन करून स्वकर्तुत्वाने विधिमंडळात प्रवेश केला. त्यांना महाराष्ट्राची नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यांना प्रकृतीने आधार दिला नाही. त्यांच्या नावाने असलेल्या या तारांगणाच्या वास्तुमुळे तरूण पिढीला अवकाशात काय चाललं आहे? या पार्श्‍वभूमीला सूचित करण्याची संधी या तारांगणाच्या माध्यमातून मिळेल.

आबा बागुल म्हणाले, विलासरावांच्या निधनामुळे चांगलं नेतृत्व लवकर आपल्यातून निघून गेल. त्यामुळे, कॉंग्रेस पोरकी झाली आहे. तारा हा चमकत असतो; त्याप्रमाणेच, चमकणार्‍या तार्‍याच नाव या तारांगणाला दिल आहे. या प्रकारचे हे जगातील पंचविसांवे आणि देशातील दुसरे तारांगण आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विलासराव शेवटच्या टप्यात देशाच्या विज्ञान, तंत्रज्ञान, भूविज्ञान खात्याचे मंत्री होते. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे, असे आपल्या संविधानात लिहीले आहे, हे राजीव गांधींचे स्वप्न होते. या तारांगणामुळे आज पुण्याला एक नवी ओळख मिळणार आहे. पुण्यात अनेक प्रेक्षणीय स्थळ आहेत. त्यामध्ये या तारंगणाची भर पडणार आहे. विलासरावांना पुण्यानी घडवलं. त्यांचे महाविद्यालयीन जीवन पुण्यात झाले. त्यामूळे त्यांच्या स्मृती पुण्यात जपणे गरजेचे होते. त्यांच्या स्मृती जपण्याचे काम या तारांगणाच्या माध्यमातून होत आहे. विलासरावांच नाव यातून अजरामर राहणार आहे. असे तारांगण उभे करून वैज्ञानिक दृष्टिकोन आपण राज्यात निर्माण करायला हवा.

गिरीश बापट म्हणाले, पुण्याच्या प्रतिष्ठेत या तारांगणामुळे भर पडली आहे. या कार्यक्रमातील भाषणातून आबा बागुलांनी आमदारकीचे तिकीट पृथ्वीराज बाबांकडे मागीतले. मात्र, यापुढे तेंच निवडून येथील की नाही याची खात्री नाही. तुम्ही आणखी तीस वर्षे नगरसेवक म्हणून आपल्या प्रभागाची सेवा करा. प्रभागामध्ये आणखी बरेंच काही करण्यासारखे आहे. तुम्ही आमदारकीसाठी उभे राहीलात तर आमच्यापुढे समस्या निर्माण होतील.

अमित देशमुख म्हणाले, एक चांगले काम विलासराव देशमुखांच्या नावाने पुण्यात सुरू होत आहे. विलासरावांना खर्‍या अर्थाने जपण्याच काम तुम्ही नागरिक करत आहेत. त्यांना साजेसे काम पुण्यात होत आहे, याचा मला आनंद आणि समाधान आहे. महाराष्ट्राला घडविण्यामध्ये पुण्याचा सिंहाचा वाटा आहे. या पुण्यामध्ये विलासरावांच्या नावाने तारांगण उभे राहते आहे, याचा आम्हाला आनंद आहे. विलासरावांच लाडकं शहर पुणे आहे.

अमीत देशमुखांना मनोहर जोशींचे शिवसेनेत आमंत्रण

शिवसैनिक म्हणून काम करताना मला सर्व पदांवर काम करायला मिळाले. मात्र, राजकिय पद मिळविण्यापेक्षा आपण देशासाठी काय करतो याचा विचार केला पाहिजे. अमीत देशमुख यांनी आबा बागुलांना आमदारकीचे तिकीट मिळावे याकरिता विविध उपाय सुचविले. मी शिवसेनेत शिवसेनेच्या स्थापनेपासून आहे. मला कधीही कुठले पद मागावे लागले नाही. त्यामुळे, तिकडे (कॉंग्रेसमध्ये) काही मिळत नसल्यास तुम्ही इकडे (शिवसेनेत) यावे.मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते