Tue, Mar 19, 2019 11:22होमपेज › Pune › तळेगाव-वडगाव दरम्यान मालगाडीचे कफ्लिकं तुटले 

तळेगाव-वडगाव दरम्यान मालगाडीचे कफ्लिकं तुटले 

Published On: Jan 24 2018 2:47PM | Last Updated: Jan 24 2018 2:47PMपुणे : प्रतिनिधी 

पुणे मार्गे मुंबईकडे जाणार्‍या मालगाडीचे कफ्लिकं (दोन डबे जोडणारा सांधा) तुटल्‍याने पुणे-लोणावळा व लोणावळा-पुणे दरम्यान धावणार्‍या लोकल ठिकठिकाणी थांबविण्यात आल्या. वडगाव रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल झाले. ऐन ऑफिसला जाण्याच्या वेळेतच रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. 

लोकलसेवा विस्कळीत झाल्याने पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, खडकी स्थानकांवर प्रवाशांची तुडुंब गर्दी बघायला मिळाली. दरम्यान, सर्व स्थानकांवर लोकलला उशीर होणार असल्याची उद्घोषणा करण्यात आल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात आला. ’पुणे ते मुंबई लोहमार्गावर मालगाडीच्या डब्यांमधील कफ्लिकं तुटल्याने ते जोडण्याचे काम रेल्वेकडून त्वरीत सुरू करण्यात आले. सुमारे अर्धा ते पाऊण तासाने हे काम पूर्ण झाल्यानंतर विस्कळीत रेल्वेसेवा पूर्ववत झाली’, अशी माहिती पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी पुढारीशी बोलताना दिली.