Thu, Apr 25, 2019 16:19होमपेज › Pune › ‘लावण्यवतींचा धमाका’ गाजणार येत्या रविवारी

‘लावण्यवतींचा धमाका’ गाजणार येत्या रविवारी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे :

‘लावण्यवतींचा धमाका’ येत्या रविवारी पुण्यात गाजणार आहे. कुसुमवंदन नाट्य संस्थेने आयोजित केलेल्या सांस्कृतिक लोककला महोत्सवाच्या निमित्ताने लावण्यांचा सदाबहार कार्यक्रम वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक दै. ‘पुढारी’ आहे.

‘लावण्यवतींचा धमाका’ हा कार्यक्रम गेल्या ऑगस्टमध्ये खास महिला प्रेक्षकांसाठी घेण्यात आला होता. त्या कार्यक्रमास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्या वेळी पुरुष प्रेक्षकांनाही या कार्यक्रमाचा आनंद घेण्याची संधी मिळावी, अशी मागणी पुढे आली. त्यामुळे येत्या रविवारच्या लावण्यांच्या कार्यक्रमात महिलांबरोबर पुरुष कुटुंबीयांनाही प्रवेश मिळणार असल्याचे संयोजक प्रमोद रणनवरे यांनी सांगितले.

‘लावण्यवतींचा धमाका’ या कार्यक्रमाचे निर्माते विलास मडके हे आहेत. संगीत संयोजन सोमनाथ फाटके यांचे आहे. संयोजन प्रमोद रणनवरे व कांचन विधाते यांचे आहे. कुसुमवंदन व सप्तरंग या संस्थांंनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात संजना बार्शीकर, दीपा माथवड, सुमन राजे बारामतीकर, स्मिता पाटील, दिव्यांकाराणी पुणेकर अशा 12 नृत्यांगना सहभागी होत आहेत. 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता होणारा हा कार्यक्रम पाहण्यासाठी विदेशी पर्यटकांनाही निमंत्रित करण्यात आले आहे, असे रणनवरे म्हणाले.