Fri, Jul 19, 2019 22:03होमपेज › Pune › कुरकुंभ वनक्षेत्रात भीषण आग 

कुरकुंभ वनक्षेत्रात भीषण आग 

Published On: May 06 2018 6:37PM | Last Updated: May 06 2018 6:37PMकुरकुंभ (जि. पुणे): वार्ताहर 

 कुरकुंभ-दौंड रस्त्यालगत रोपवाटीकेच्या शेजारील वनविभागाच्या हद्दीत रविवारी दुपारी ३ च्या सुमारास अचानक भीषण आग लागली.  या आगीत वनक्षेत्रातील विविध झाडांची आणि गवत जळून खाक झाले आहे. आगीच्या घटनांमुळे वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

आग आटोक्यात आणण्यासाठी दौंड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न केले. मात्र, वनविभागाच्या परिसरात तारेचे कुंपण असल्याने पाण्याचा बंब आतमध्ये नेण्यात आला नाही त्‍यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अडचणी येत होत्या.

 

Tags : pune kurkumbha, Sanctuary,  fire