Sun, Mar 24, 2019 17:01होमपेज › Pune › कुरकुंभ जवळ अपघातात महिलेचा मृत्यू, चार जण जखमी

कुरकुंभ जवळ अपघातात महिलेचा मृत्यू, चार जण जखमी

Published On: Feb 26 2018 5:55PM | Last Updated: Feb 26 2018 5:55PMपुणे : प्रतिनिधी

वाहनाची टायर फुटून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर चौघे जण जखमी झाले आहेत. ही घटना कुरकुंभ (ता.दौंड) जवळ महामार्गालगत   कांबळे पेट्रोल पंपाजवळ 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद चाटे हे सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जात असताना कुरकुंभ गावाजवळ त्यांच्या वाहनाचा टायर फुटला. त्यामुळे चाटे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन सर्व्हिस रस्त्यालगत असलेल्या शेतात कोसळले. अपघातात चाटे यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर दोन मुली आणि एका मुलासह चार जण जखमी झाले आहेत.