Fri, Feb 22, 2019 03:24होमपेज › Pune › पोलिस शिपायाला लाच घेताना रंगेहात पकडले

पोलिस शिपायाला लाच घेताना रंगेहात पकडले

Published On: May 06 2018 7:41AM | Last Updated: May 06 2018 7:41AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील कोंढवा पोलिस ठाण्यातील पोलिस शिपायाला ८ हजार रुपयांची लाच घेताना पुणे लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने मध्यरात्री रंगेहात पकडले. वैभव चंद्रकांत बनकर (वय २८) असे पकडण्यात आलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. 

३२ वर्षीय तक्रारदाराचे कोंढवा भागात हॉटेल आहे. त्यांचे हॉटेल उशिरापर्यंत सुरू असताना त्यावर कारवाई न करण्यासाठी त्याने ८ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचून मध्यरात्री बनकरला लाच घेताना रंगेहात पकडले.
 

Tags : pune news, kondava police station, police constable, bribe