Wed, Apr 24, 2019 21:33होमपेज › Pune › कोल्हापूर अपघात : नवस फेडायला गेले आणि कुटुंबच संपले (Video)

कोल्हापूर अपघात : नवस फेडायला गेले आणि कुटुंबच संपले (Video)

Published On: Jan 27 2018 1:43PM | Last Updated: Jan 27 2018 2:50PMनेहा सराफ/केतन पळसकर 

अवघ्या १३ हजार लोकवस्तीचे  बालेवाडी गाव. जसजसे पुणे शहर वाढू लागले तसतशी बालेवाडीची प्रगती झाली. याच गावातील नामदेव भाऊ बालवाडकर यांची कन्या असलेल्या मंदा यांचा विवाह भरत केदारी यांच्याशी सुमारे ४० वर्षांपूर्वी झाला. त्याच केदारी कुटुंबातील बारा जण शुक्रवारी पहाटे गणपतीपुळ्याला गेले होते. निमित्त होते सचिन भरत केदारी यांच्या आराध्य या मुलाच्या जन्माचा नवस फेडण्याचे. सोबत बहीण छाया नांगरे आणि मनीषा वरखडे यांच्यासह कुटुंबियही सहभागी होते.

वाचा मुख्य बातमी : कोल्हापूरः शिवाजी पुलावरून मिनी बस पंचगगा नदीत कोसळली, पुण्यातील १३ ठार

गणपतीपुळे येथे दर्शन घेऊन दौरा करून सर्व कुटुंबीय कोल्‍हापूरच्या दिशेने परतीच्या मार्गाला लागले होते. कोल्‍हापूरमध्ये प्रवेश करताना पंचगंगा पुलावरून जात असताना त्यांच्या मिनी बसला अपघात झाला. या अपघातात सर्व कुटुंबाला आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे पुण्यातील बालवाडी गावावर शोककळा पसरली आहे. कुटुंबियांच्या या निधनामुळे त्यांच्या आप्‍तस्‍वकीयांनी हंबरडा फोडला आहे. 

एका क्षणात एक कुटुंब संपल्याने या कुटुंबाला आता सावरायचं कुणी, असा सवाल येथे उपस्‍थित होत आहे. उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले आहे.