Wed, Jan 16, 2019 15:53होमपेज › Pune › ‘सुंदर मी होणार’ कस्तुरी क्लबतर्फे आजपासून ब्यूटी सेमिनार

‘सुंदर मी होणार’ कस्तुरी क्लबतर्फे आजपासून ब्यूटी सेमिनार

Published On: Jan 06 2018 1:40AM | Last Updated: Jan 06 2018 1:29AM

बुकमार्क करा
पुणे ः प्रतिनिधी

सुंदर दिसावे ही प्रत्येकीची सुप्त इच्छा. सणसमारंभातून, ऑफिस मिटींग्जमध्ये, लग्नसोहळ्यातून आकर्षक व्यक्तिमत्त्वाने उठून दिसावे या तिच्या इच्छेचा सन्मान करून ‘सुंदर मी होणार’ या कार्यशाळेचे आयोजन होत आहे. लीज् ब्यूटी सेंटर आणि स्पाच्या संचालिका नामवंत सौंदर्यशास्त्रज्ञ लीना खांडेकर स्वत: हे प्रशिक्षण देतील. 

सुंदर दिसण्यात वेशभूषेच्या नेटकेपणाला मोठे महत्व आहे. त्यामुळे साडी ड्रेपींगच्या लेटेस्ट स्टाईल्स यात शिकवण्यात येतील. त्याला अनुरूप अशा सोप्या पण उठावदार हेअरस्टाईल्स आणि आकर्षक मेकअप याचेही प्रशिक्षण देण्यात येईल. 

हल्ली अनेक सौंदर्य विषयक ट्रीटमेंट्स उपलब्ध आहे. त्या कशा करून घ्याव्यात आणि त्याही रास्त दरात याबद्दलही इथे चर्चा करण्यात येईल. घरगुती निगेकरीता काही टिप्स देयात येतील. शहराच्या विविध भागात या कार्यशाळा होणार असून त्याचे वेळापत्रक  खालीलप्रमाणे आहे.