Fri, Jan 18, 2019 10:56होमपेज › Pune › पीएमपी’मध्ये दागिने चोरणारे दाम्पत्य अटकेत

पीएमपी’मध्ये दागिने चोरणारे दाम्पत्य अटकेत

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 12:59AM

बुकमार्क करा

‘पुणे : प्रतिनिधी 

पीएमपी बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या पर्समधील दागिने चोरणार्‍या दाम्पत्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणत 202 ग्रॅमचे पाच लाख 74 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. विनोद शामराव साळुंखे (वय 50), शामला विनोद साळुंखे (वय 46, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, मूळ-रा. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल वाकुर्डेकर या सांगवी येथून मुलाकडे धनकवडी येथे बसने जात होत्या. त्यावेळी प्रवसादरम्यान पर्समधील 35 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले होते. गस्त घालत असताना भारती विद्यापीठ पोलिसांना  पीएमपी बसमध्ये चोर्‍या करणारी एक महिला व पुरूष भारती विद्यापीठ समोरील बसस्टॉप उभे आहेत, अशी माहिती मिळाली होती.  त्यानुसार पथकाने दोघांना पकडले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यानी महिलेचे दागिने चोरल्याचे कबूल केले. तसेच, तपासामध्ये त्यांच्याकडून आणखी चार गुन्हे उघडकीस आणत पोलिसांनी 202 ग्राम वजनाचे पाच लाख 74 हजार रूपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले. 

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त रविंद्र सेनगावकर, परिमंडळदोनचे पोलिस उपायुक्त डॉ.  प्रविण मुंढे सहायक आयुक्त डॉ. शिवाजी पवार वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर ताकवले पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड, त्यांच्या पथकातील प्रदीप गुरव, विनोद भंडलकर, गणेश सुतार यांच्या पथकाने केली.