Wed, Feb 20, 2019 21:26होमपेज › Pune › एकाच एसटीत पिता पुत्र झाले चालक-वाहक 

एकाच एसटीत पिता पुत्र झाले चालक-वाहक 

Published On: Feb 12 2018 6:25PM | Last Updated: Feb 12 2018 6:23PMपुणे: प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बसमध्ये नुकताच एक अपूर्व योगायोग जुळून आला. एसटी महामंडळाकडून वीर यात्रेसाठी सोडण्यात आलेल्‍या जादा बसेसमध्ये पिता पुत्राला चालक वाहक म्‍हणून एकाच बसमध्ये कार्य करण्याची संधी मिळाली. यामुळे या दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

दि. 6 ते 10 फेब्रुवारीदरम्यान भरणार्‍या वीर यात्रेसाठी एसटीच्या पुणे विभागातून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्‍या. यावेळी एसटी महामंडळात कार्यरत असणारे ए. यू. माळशिकारे (पिता) व ए. ए. माळशिकारे (पुत्र) हे दोघेही चालक व वाहक म्हणून एकाच बसमध्ये जबाबदारी पार पाडत असल्याचे दुर्मिळ चित्र दिसून आले. दरम्यान, ’एका पिढीने आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा वारसा पुढच्या पिढीस हस्तांतरित केल्याचा अपूर्व योगायोग’, अशा शब्दांत एसटी प्रशासनाने त्याचे वर्णन केले आहे.