Wed, Jun 26, 2019 12:17होमपेज › Pune › ‘हायपरलूप’चा अहवाल शासनाला सादर करणार

‘हायपरलूप’चा अहवाल शासनाला सादर करणार

Published On: Jan 09 2018 1:35AM | Last Updated: Jan 09 2018 1:30AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

पुणे-मुंबई दरम्यान प्रवास अति जलद वाहतूक सेवेसाठी ‘हायपरलूप’चा वापर केला जाणार आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल व्हर्जिन हायपरलूप वन कंपनीने पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाला (पीएमआरडीए) दिला आहे. प्राप्त झालेला अहवाल  येत्या 15 जानेवारीला राज्य शासनाला सादर केला जाणार आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे-मुंबई हायपरलूप वाहतूक सेवेबाबत राज्यशासन आणि लॉस एंजेलिसमधील ‘हायपरलूप’ यांच्यात नोव्हेंबर 2017 मध्ये सामंजस्य करार झाला आहे. या करारानुसार पुणे-मुंबई विभागातील मार्गांचा प्राथमिक अभ्यास अहवाल तयार करून हायपरलूप आधारित प्रवासी ट्रॅफिक सिस्टिम कार्यान्वित केली जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पीएमआरडीए आणि हायपरलूप कंपनी संयुक्तरित्या हा अहवाल तयार करण्यात आला आहे, असे गित्ते यांनी सांगितले.

प्रकल्पास त्वरीत मान्यता मिळाल्यास अवघ्या आठ वर्षात म्हणजे 2026 मध्ये हा प्रकल्प कार्यान्वीत होणार आहे. हायपरलूप यंत्रणा एकविसाव्या शतकातील नागरिकांच्या वाढत्या मागणीसाठी विकसित होणार्‍या द्रुतगतीच्या वाहतूक यंत्रणेचा महत्वाचा भाग असणार आहे. पुणे आणि मुंबई शहरांसाठी ही वाहतूक उपयुक्त ठरणार आहे. हायपरलूप तंत्रज्ञानाने मुंबई आणि पुणे विभागांतील महानगर प्रदेशांना जोडल्यास प्रवास वेळ 20 मिनिटांपेक्षा कमी वेळेत होणार आहे. या अहवालात हायपरलूपने पुणे ते वाशी आणि पुणे ते सांताक्रूझ असे तीन मार्ग सुचविले आहेत.  सदर अहवाल राज्य शासनास सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समिती अभ्यास करणार आहे. त्यानंतर आवश्यक ते बदल करून या प्रकल्पास मान्यता मिळणार असल्याचेही गित्ते यांनी सांगितले.