Sat, Jul 20, 2019 15:00होमपेज › Pune › पुणे : पत्नीची हत्या करून पती पोलिस ठाण्यात हजर

पुणे : पत्नीची हत्या करून पती पोलिस ठाण्यात हजर

Published On: Feb 18 2018 10:07PM | Last Updated: Feb 18 2018 10:07PMपुणे : प्रतिनिधी

पुण्यातील मध्यवस्तीत असणाऱ्या एका हॉटेलमध्ये थांबलेल्या पती-पत्नीत वाद होऊन पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पती स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. ही घटना रविवारी रात्री 8 वाजता घडली. पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय होता त्यातून खून झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही मुंबईचे रहिवाशी असल्याची माहिती आहे. 

दीपा आस्वारे उर्फ सिंग (32) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर, मलयकुमार सिंग असे पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 

सर्मथ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुयश हॉटेल आहे. याठिकाणी दोघे आज आले होते. त्यांनी हॉटेलमधील 201 ही रूम बुक केली होती. परंतु, रात्री आठ वाजता आरोपी पतीने पत्नी दीपा हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तो थेट समर्थ पोलिस ठाण्यात हजर झाला आणि पत्नीचा खून केल्याचे सांगितले. त्यावेळी पोलिसही चक्रावून गेले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी खून झाल्याचे समोर आले. पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.