Sun, Jul 21, 2019 12:51होमपेज › Pune › पतंगाचा मांजा पक्ष्यांच्याही मुळावर

पतंगाचा मांजा पक्ष्यांच्याही मुळावर

Published On: Feb 14 2018 2:55AM | Last Updated: Feb 14 2018 1:43AMपुणे : प्रतिनिधी

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) बंदी घातलेल्या चायनीज, नायलॉन मांजामुळे शेकडो पक्षी गंभीर जखमी होत असून, या घटनांंचे प्रमाण दिवसेेंदिवस वाढत आहे. शहरात दररोज पाच पक्षी मांजाच्या जाळ्यात अडकले जात आहेत, अशी नोेंद अग्निशामक दलाकडे आहे. तर, मांजाचा फास लागून पक्ष्यांचा मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांत शहरात जवळपास 275हून अधिक पक्ष्यांचा जीव मांजाने घेतला आहे. तीन दिवसांपूर्वी मांजाने महिलेचा जीव घेतल्यानंतर पोलिस, महापालिका प्रशासनाला जाग आली. त्यामुळे बंदी असलेल्या मांजाची विक्री करणार्‍यांचा शोध युध्दपातळीवर घेतला जात आहे. 

शहरात गेल्या आठवड्यात चायनीज मांजात अडकून जखमी झाल्याने दुचाकीस्वार महिलेचा उपचारादारम्यान मृत्यू झाला. तर, काही दिवसांपूर्वीच येरवडा व मुंढवा भागात मांजामुळे दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. शहरात दरवर्षी डिसेंबर महिना सुरू होताच पतंग उडविण्यास सुरुवात होते. विशेषत: यात कोणाचा पतंग जास्त उंचावर जातो आणि एकमेकांचे पतंग कापण्याची (कट) स्पर्धा सुरू असते. डिसेेंबरमध्ये सुरू झालेला पतंगबाजीचा खेळ जानेवारी आणि फेब्रुवारीपयर्र्ंत सुरू असतो. 

पतंग उडविण्याच्या या आनंदी खेळात मात्र, घातक आणि बंदी घालण्यात आलेल्या चायनीज मांजा व नायलॉन दोर्‍याचा सर्रास वापर होत आहे. त्यातही पतंग उडविण्याचा खेळ संपल्यानंतर बेफिकीरांकडून हा मांजा तसाच सोडून दिला जातो. तो झाडे तसेच इमारतीवर अडकला जातो. पतंग महोत्सवानंतर मांजाच्या दोर्‍या रस्त्यांच्या मधोमद तशाच सोडल्या जातात. त्यामुळे आकाश उडणारे पक्षी मांजात अडकून जखमी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.तसेच, दुचाकीवरून जाणार्‍या वाहन चालकांना देखील अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. 

दरम्यान मांजात अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करण्यासाठी शहराच्या विविध भागातून अगिग्नशामक दलाकडे दररोज पाच ते सात तक्रारीचे फोन येत आहेत. यामध्ये सर्वाधिक घटना या मांजात अडकल्याने होत असल्याचे निरीक्षण अग्ग्निशामक दलाने नोेंदवले आहे. शहरातील अनेक भागांमध्ये हे चित्र दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीत पाहायला मिळत आहे. त्यामुळे या घातक मांजाचा वापर बंद करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.