होमपेज › Pune › पुण्यात हॉटेल चालकास धमकावून लुबाडले

पुण्यात हॉटेल चालकास धमकावून लुबाडले

Published On: Mar 22 2018 10:55AM | Last Updated: Mar 22 2018 10:55AMपिंपरी : प्रतिनिधी

कामावरून निघालेल्या हॉटेल व्यवस्थापकास अडवून, मारहाण करण्याची धमकी देऊन, जबरदस्तीने एटीएम सेंटरमधून तेरा हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार कस्तुरी हॉटेल वाकड ते थेरगाव दरम्यान घडला.

कुणाल शंकर जेऊघाले (२२, रा. साईनाथनगर, निगडी) याने फिर्याद दिली आहे. तर कारमधील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल हा त्याच्या दुचाकीवरून जात असताना कारमधील चोरट्यानी कार आडवी लावून त्याला थांबवण्यात आले. जबरदस्तीने कारमध्ये बसवून थेरगाव येथे नेऊन एटीएममधून पैसे काढून घेतले तसेच धमकी दिली. हा प्रकार बुधवारी दुपारी तीन ते साडे चार दरम्यान घडला. तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.