Sat, Sep 22, 2018 04:53होमपेज › Pune › पुण्यातील गिर्यारोहक दरीत पडून मृत्युमुखी

पुण्यातील गिर्यारोहक दरीत पडून मृत्युमुखी

Published On: Mar 25 2018 1:51AM | Last Updated: Mar 25 2018 1:50AMपुणे : प्रतिनिधी

नाशिकच्या वाडीवर्‍हेजवळील घरगड ऊर्फ गडगड्या किल्ल्यावर शनिवारी पुण्याच्या हेमेंद्र सुरेश अधटराव (26) या गिर्यारोहकाचा पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाला. मुंबईच्या अव्वल गिर्यारोहण संस्थेचे 14 जणांचे पथक घरगड आणि अंजनेरीजवळील रांजणगिरी या गडांवर गेले होते. साथिदारांना मंदिरात थांबवून कातळ टप्प्याची पाहणी करण्याकरिता चौघांचे पथक रवाना झाले. तेथे पोहोचण्याच्या आधी पुढे असलेल्या हेमेंद्रचा पाय घसरला व क्षणात तो दरीत पडला. या टप्प्यावर झाडी नसल्याने घसरताना त्याला पकडण्यासाठी कोणताही आधार मिळू शकला नाही. चमूने तातडीने नाशिक येथील वैनतेय गिर्यारोहण संस्था व भोसला अ‍ॅडव्हेंचर फाउंडेशनच्या गिर्यारोहकांना मदतीस बोलावून हेमेंद्रचा शोध घेण्यास सुरुवात केली.
 

 

tags : pune,news,hemendra,Suresh, Harkartava, mountaineers, Death,