Sun, Mar 24, 2019 22:58
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › चाकूचा धाक दाखवून १३ लाख ८७ हजारांचे दागिने लुटले

चाकूचा धाक दाखवून १३ लाख ८७ हजारांचे दागिने लुटले

Published On: Dec 18 2017 10:38AM | Last Updated: Dec 18 2017 10:37AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने कर्वेनगर येथून गाडीत बसवत चाकूचा धाक दाखवून १३ लाख ८७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. 

मुकेश शेलार (52, कर्वे नगर) यांनी यासंदर्भात अलंकार पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश शेलार कर्वेनगर परिसरात राहतात. रविवारी सकाळी ते एका लग्नाला जाण्यासाठी निघाले. त्यावेळी त्यांच्या अंगावर सोन्याचे दागिने होते.  एका कारमधून काहीजण आले. त्यांनी शेलार यांना कागदपत्रे द्यायची आहेत असे सांगून कारमध्ये बसवले. त्यानंतर कार खेड शिवापूरच्या दिशेने नेली. रस्त्यात त्यांना कारमधील लोकांनी चाकूचा धाक दाखवून अंगावरील तेरा लाख ८७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर त्यांना खेड शिवापूर येथे सोडून देत ते पसार झाले. याबाबत पुढील तपास अलंकार पोलिस करत आहेत.