Thu, Apr 25, 2019 07:36होमपेज › Pune › मुलीचा विनयभंग करणारा पिता अटकेत

मुलीचा विनयभंग करणारा पिता अटकेत

Published On: Dec 03 2017 1:44AM | Last Updated: Dec 03 2017 1:19AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

जन्मदात्या पित्यानेच घरात झोपलेल्या अकरा वषार्र्ंच्या मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्या आईने त्यांना जाब विचारल्यानंतर तिला पोलिसात तक्रार दिल्यास दोघींनाही जिवे मारण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार सन 2016 मध्ये घडला. मात्र, त्यानंतर महिला घाबरलेली असल्याने तिने आता आपल्या पतीविरोधात खडकी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, खडकी पोलिसांनी त्याला अटकही केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला अकरा वर्षांची मुलगी आहे. महिला तिच्या पतीसोबत दापोडी येथील फुलेनगर येथे राहण्यास होती. त्यानंतर ते बोपोडी येथेही राहण्यास आले. दरम्यान, 2016 मध्ये महिलेची मुलगी घरात झोपलेली होती. त्या वेळी रात्रीच्या सुमारास आरोपी पतीने झोपलेल्या मुलीला उठवून तिच्या अंगावरून हात फिरवून तिचा विनयभंग केला. त्यानंतर ही बाब मुलीने तिच्या आईला सांगितली. तिने पतीला याबाबतचा जाब विचारला. मात्र, जाब विचारल्यावर त्याने महिलेला शिवीगाळ करून आई व मुलगी दोघींनाही जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महिला घाबरली होती. मात्र, त्यानंतर तिने धाडस करून पतीविरोधात तक्रार दिली. त्यानंतर खडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पतीला अटक करण्यात आली आहे.