Sat, Jul 20, 2019 23:35होमपेज › Pune › पुणेः नाल्यात बालकासह २ पुरुषांचे मृतदेह आढळले

पुणेः नाल्यात बालकासह २ पुरुषांचे मृतदेह आढळले

Published On: Feb 23 2018 8:33PM | Last Updated: Feb 23 2018 8:37PMपुणेः प्रतिनिधी 

गणेश पेठेतील नागझरी नाल्यात दोन पुरुषांसह एका बालकाचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी आढळून आला. नाल्यात तीन मृतदेह आढळून आल्याने पोलिसांसह नागरिक चक्रावून गेले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी फरासखाना पोलिस दाखल झाले असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. 

शुक्रवारी सायंकाळी गणेश पेठेतील नागझरी नाल्यात तीन मृतदेह पडलेले असल्याचे नागरिकांना दिसून आले. यात एक बालक असून दोन पुरुषांचे मृतदेह आहेत. त्यानंतर या ठिकाणी प्रचंड गर्दी जमली होती. नागरिकांनी फरासखाना पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकार्‍यांसह फरासखाना पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरु असून त्यांचा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे तिघेही एकाच कुटुंबातील असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शवविच्छदनानंतर याचा खुलासा होईल असे पोलिसांनी सांगितले.