Tue, Feb 19, 2019 10:05होमपेज › Pune › पुणेः अपहरण करुन तरुणीवर चौघांचा बलात्कार  

पुणेः अपहरण करुन तरुणीवर चौघांचा बलात्कार  

Published On: May 26 2018 6:11PM | Last Updated: May 26 2018 6:11PMपिंपरी : प्रतिनिधी 

अपहरण केलेल्या तरुणीसोबत जबरदस्तीने विवाह करुन, तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार करुन अश्लील फोटो फेसबुकवर टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पिडीत तरुणीने फिर्याद दिली आहे. चिमणाजी चौधरी, नथाराम जसाराम चौधरी (दोघेही रा. नेरूळ, नवी मुंबई), जोगाराम चौधरी (रा. पनवेल) आणि काळुराम चौधरी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ एप्रिल २०१८ रोजी दुपारी बाराच्या सुमारास पिडीत तरुणीचे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण करण्यात आले. तरुणीला मुंबईतील बांद्रा परिसरात नेवून तिचा जबरदस्तीने मोहनलाल चौधरी याच्याशी विवाह लावला. 

पिडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पिडित तरुणीच्या नावे फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावरून अश्लील फोटो ‘अपलोड’ केले आणि तिची बदनामी केली. दरम्यानच्या काळात पिडित तरुणीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली होती. एमआयडीसी पोलिसांनी तपास करुन पिडीत तरुणीची सुटका केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. अधिक तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत.