Mon, May 27, 2019 08:40होमपेज › Pune › पिंपरीत फॉर्च्युनर कार हॉटेलात घुसली, १ ठार (Video)

पिंपरीत फॉर्च्युनर कार हॉटेलात घुसली, १ ठार (Video)

Published On: Apr 30 2018 2:00PM | Last Updated: Apr 30 2018 2:44PMपिंपरी : प्रतिनिधी 

भरधाव वेगाने धावणारी फॉर्च्युनर कार हॉटेलमध्ये घुसल्याने तीन जण चिरडले गेले आहेत. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सांगवी येथील फेमस चौकात ही घटना घडली. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. 

वाहनचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाता १ जण ठार झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. फॉर्च्युनर कार थेट हॉटेलमध्ये घुसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.  

Tags : pune, fortune car, accident, pimpari, one death, pune news