Sat, Apr 20, 2019 15:52होमपेज › Pune › माजी नगराध्यक्षाच्या खून प्रकरणात एकाचा जामीन फेटाळला

माजी नगराध्यक्षाच्या खून प्रकरणात एकाचा जामीन फेटाळला

Published On: Dec 13 2017 2:46AM | Last Updated: Dec 13 2017 1:33AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी 

तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन बाळासाहेब शेळके (38) यांचा गोळ्या घालून निर्घृण खून केल्याप्रकरणी दाभाडे टोळीतील एकाचा जामीन विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी फेटाळून लावला आहे.   गुरुदेव रमेश मराठे (28. रा. वराळे, ता. मावळ, जि. पुणे) असे जामीन फेटाळण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात बंटी ऊर्फ शंकर रामचंद्र दाभाडे (35), संदीप सोवपान पचपिंड (30), खंडू उर्फ पप्पू दत्तात्रय पचपिंड (30), आकाश दीपक लोखंडे (21), रूपेश सहादू घारे (25), राजेश दादाभाऊ ढवळे (30), शिवाजी भरत आढाव (24),  अमित अनिल दाभाडे (23), सचिन लक्ष्मण ठाकर (26),  देवानंद उर्फ देविदास विश्‍वनाथ खर्डे, नितीन शिवाजी वाडेकर (22), दत्ता ज्ञानेश्‍वर वाघोले (22), सूरज विलास गायकवाड (22), अभिषेक ऊर्फ माऊली ऊर्फ ज्ञानेश्‍वर मारुती गायकवाड, अजय राजाराम हिंगे, पिंट्या ऊर्फ बाळू दत्तात्रय सांडभोर (33), अमोल अनिल लांढे (21), मॉन्टी उर्फ संकेत जगदीश नानेकर, पंकज कृष्णाजी आवटे (28) यांच्यावर कट करून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळीचा म्होरक्या शाम रामचंद्र दाभाडे, धनंजय प्रकाश शिंदे उर्फ तांबोळी यांचा मृत्यू झाला आहे.याप्रकरणात 20 आरोपींवर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.   

मृत श्याम दाभाडे हा सराईत गुन्हेगार होता. तसेच तो टाळीचा म्होरक्या होता, तर इतर आरोपी टोळीचे सदस्य आहेत. मृत सचिन शेळके यांचा तळेगाव एमआयडीसी परिसरात पाणीपुरवठा आणि खडी सप्लाय करण्याचा व्यवसाय होता. टोळीकडून माजी नगराध्यक्ष शेळके यांच्याकडे हप्ता मागितला जात होता. परंतु, शेळके यांचा हप्ता देण्यास विरोध होता. तसेच ते टोळीलाही जुमानत नव्हते. 2013 मध्ये सचिन शेळके यांना पैशासाठी जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच कारणावरून श्याम दाभाडे याने आपल्या साथीदाराच्या मदतीने कट रचला. तळेगाव स्टेशन रस्त्यावरील खांडगे पेट्रोलपंपासमोर 16 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी अकरा वाजता धारधार हत्यारांनी वार करून तसेच गोळ्या झाडून शेळके यांचा निर्घृण खून केला होता. याप्रकरणात मराठेला देखील अटक झाली होती. या प्रकरणात आपल्याला जामीन मिळावा, यासाठी मराठेने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याला अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला. टोळीची तळेगाव परिसरात दहशत असून, तो साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्याने अ‍ॅड. कावेडिया यांनी त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून मराठेचा जामीन फेटाळून लावला आहे.