Wed, Jul 24, 2019 12:20होमपेज › Pune › साडेतीन लाखांचा विदेशी मद्यसाठा मरकळमध्ये जप्त

साडेतीन लाखांचा विदेशी मद्यसाठा मरकळमध्ये जप्त

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 12:53AM

बुकमार्क करा

पुणे/कामशेत : प्रतिनिधी

नाताळ व नववर्षानिमित्ताने गोवा राज्यातील बनावटीचे विदेशी मद्याची चोरट्या मार्गाने होणारी विक्री रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने विशेष पथकांची नेमणूक केली आहे. तळेगाव येथील पथकाने हद्दीतील केलेल्या कारवाईत सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि. 22) केली आहे.

 मरकळ गावाच्या हद्दीतील हॉटेल तुळजाभवानी ढाब्यामध्ये विदेशी मद्याची विक्री होत असल्याचा संशय आला. धाब्याची झडती घेतली असता  गोवा बनावटीचा विदेशी आणि देशी मद्याचा साठा मिळून आला. तसेच विदेशी मद्यांवरील काही बाटल्यांची एमआरपी किंमत कमी असल्याचे आढळून आले. आरोपीकडून 7 हजार 881 रुपयांचा मद्याचा साठा मिळून आला. मद्यसाठा केल्याप्रकरणी हनुमंत देवराम काची (रा. मरकळ) याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच गंगाराम खंडू कोळपे (रा. कोयाळी विरोबा वस्ती ता. खेड ) याच्या राहत्या घरातून गोवा राज्य विक्रीस मान्यता असलेल्या विदेशी मद्याच्या 318 बाटल्या जप्त केल्या असून त्याची  किंमत 59 हजार 661 रुपये आहे. मद्याची खरेदी विक्री आणि वाहतूक करण्यास  वापरलेले एम. एच. 43 एन. 3816 या  क्रमांकाचे चारचाकी वाहन ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपींकडून 3 लाख 67 हजार  542 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त अर्जुन ओहोळ, उपअधीक्षक मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक परब, निरीक्षक संजय सराफ, नरेंद्र होलमुखे, रवींद्र भूमकर, अतुल बारंगुळे, पालवे,  गायकवाड, गळवे व भाताने यांच्या पथकाने केली आहे.