Wed, Apr 24, 2019 11:29होमपेज › Pune › ‘आधार’साठी ‘टपाल’ मिळणार २४८यंत्रे

‘आधार’साठी ‘टपाल’ मिळणार २४८यंत्रे

Published On: Jan 09 2018 1:35AM | Last Updated: Jan 09 2018 12:40AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

आधारकार्ड काढण्यासाठी मागील काही महिन्यांपासून सुरू असलेली परवड आता थांबणार असून, टपाल विभागात आता आधारकार्ड काढण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यासाठी 248 यंत्रे उपलब्ध होणार आहेत. त्यामधील सुमारे 71 यंत्रे पुणे शहरातील टपाल विभागासाठी देण्यात येणार आहेत. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात ही  सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.
केंद्र शासनाने टपाल विभागात आधारकार्डामधील नोंदी दुरूस्त करणे, नागरिकांची चुकलेली छायाचित्रे बदलणे आदि कामे  सुरू  करण्यात आली आहेत.

त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात सोय उपलब्ध झाली आहे. मात्र ज्या नागरिकांनी अजुनपर्यत आधारकार्ड काढलेली नाहीत. त्यांची चांगलीच परवड होऊ लागली होती. जिल्हाधिकारी कार्यालयच्यावतीने ई-सेवा केंद्रामध्ये आधारकार्ड काढण्याची सुविधा देण्यात आली होती. परंतु, या सेवा केंद्रातील कर्मचा-यांनी मनमानी पध्दतीने फी आकारल्या होत्या. त्याबाबत नागरिकांनी तक्रारी देखील केल्या होत्या. त्यामुळे या सेवा केद्रामधून आधारकार्ड काढण्याची सुविधा बंद करण्यात आली होती . त्यानंतर मात्र काही नागरिकांना आधारकार्ड काढणे अतिशय जिकीरीचे झाले होते. ही बाब लक्षात घेऊन आता पुणे विभागातील पुणे, नगर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यात असलेल्या टपाल कार्यालयात  आधारकार्ड काढण्याची सुविधा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात सुरू  होणार आहे. अशी माहिती पोस्टमास्तर जनरल गणेश सावळेश्‍वरकर यांनी सोमवारी सांगितली.