Sat, Apr 20, 2019 08:23होमपेज › Pune › बनावट इमेलद्वारे पाच लाखांची फसवणूक

बनावट इमेलद्वारे पाच लाखांची फसवणूक

Published On: Dec 13 2017 2:39AM | Last Updated: Dec 13 2017 1:41AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

कंपनीच्या अध्यक्षाच्या नावाच्या ईमेलसारख्याच बनावट ईमेल आयडीवरून मेल  पाठवून खात्यात  5 लाख रूपये बँक खात्यात भरायला लावत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार आला आहे. याप्रकरणी सुधीर भटैटी (वय 46, रा. विमाननगर) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिसोळी येथे अरविंद लिमिटेड टेली कॉम डिव्हीजन नावाची कंपनी आहे.

या कंपनीचे अध्यक्ष बिपनील मल्होत्रा यांच्या ईमेलआयडी सारखाच बनावट ईमेल आयडी तयार केला. त्यानंतर त्या बनावट ईमेल आयडीवरून अंधेरेतील एचडीएफसी बँकेच्या शाखेत मोनिका एन्टर प्रायजेस या कंपनीच्या खात्यामध्ये 5 लाख रूपये भरावा असा इमेल केला. त्यानंतर  कंपनीच्या लोकांनी पाच लाख रुपये भरले. त्यानंतर हा ईमेल बनावट असल्याचे लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर भटैटी यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून  पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) शिंदे करत आहेत.