Fri, Feb 22, 2019 20:23होमपेज › Pune › कर्मचार्‍याची महिला अधिकार्‍यास शिवीगाळ

कर्मचार्‍याची महिला अधिकार्‍यास शिवीगाळ

Published On: Dec 13 2017 2:39AM | Last Updated: Dec 13 2017 1:39AM

बुकमार्क करा

पुणे /येरवडा : प्रतिनिधी 

महावितरणमधील तारतंत्री कर्मचार्‍याने मद्यप्राशन करून उपअभियंता महिलेला शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार येरवडा येथे घडला आहे. महिला अभियंत्यानी याप्रकरणी येरवडा पोलिसांकडे तकार दिली आहे.  दरम्यान या कर्मचा-यावर या अगोदर देखील एक गुन्हा दाखल आहे. निर्मल सुभाषराव देशमुख (40,रा.गंगा कोष्टला, खराडी) असे तारतंत्री कर्मचार्‍याचे नाव असून याबाबत वैशाली नितीन जगताप (38,रा.कुमारकृती सोसायटी, वडगावशेरी) यांनी तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप या महावितरणच्या कल्याणीनगर कार्यालयात उप अभियंता पदावर कार्यरत आहेत. देशमुख यांनी अधिकारी जगताप यांना तुम्ही कामावर उशीरा येता, तुमच्या विरोधात खूप तक्रारी आहेत असे म्हणत गोंधळ घातला. जगताप यांनी येरवडा पोलिसांकडे तक्रार केली असता पोलिसांनी देशमुख यास ताब्यात घेतले .त्याने मद्य प्राशन केले आहे का याची तपासणी केली असता मद्य पिल्याचे निष्पन्न झाल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जी. जी. मोरे यांनी सांगितले. दरम्यान नगर रस्ता महावितरणच्या कार्यालयाबाबत अनेक तक्रारी आहेत. वरिष्ठांचे कर्मचार्‍यांवर व कामावर नियंत्रण नाही. देशमुख यांचे अनेक कारनामे चर्चेत असून त्यांना निलंबित करावे अशी मागणी भीम लहुजी महासंग्राम संघटनेने  महावितरणच्या वरिष्ठ  कार्यालयाकडे निवेदन देऊन  केली आहे.