Tue, Mar 19, 2019 11:23होमपेज › Pune › माध्यमांमध्ये भयकंर भय तांडव सुरु

माध्यमांमध्ये भयकंर भय तांडव सुरु

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

राजदीप सरदेसाई यांचे मत

देशात राष्ट्रवादी आणि राष्ट्रविरोधी अशी सरसकट माध्यमांची आणि पत्रकारांची विभागणी सुरु असून त्यांना दमबाजी केली जात आहे. माध्यमांची आज परस्थिती बदलली असून माध्यमांमध्ये एक भयंकर भय तांडव सुरु असून दिल्लीतल्या मोदी सरकारलाच माध्यमे घाबरतात असे नव्हे तर राज्याराज्यात त्याच्याच आवृत्या निघत आहेत, असे मत वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केले.   
पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि सिंबॉयोसिस सोसायटी यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यानमालेत 

ते बोलत होते. यावेळी सिंबॉयोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर आणि सिंबॉयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू रजनी गुप्ते, लतिका पाडगावकर आदी उपस्थित होते. 

यावेळी सरदेसाई म्हणाले, आज देशामध्ये रावण स्कूल ऑफ जर्नालिझम फोफावत असताना नेहमी संतुलित विचार मांडणार्‍या आणि समाजाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करणार्‍या दिलीप पाडगावकरांची आठवण सर्वांना येणे स्वाभाविक आहे. पत्रकारितेत नैतिक मूल्ये जोपासायला हवीत. समाजात जे काही घडत आहे त्याची सत्यता लोकांपर्यंत पोचवायचे काम पत्रकाराचे असते. पत्रकार हा मातीशी जोडलेला हवा. दिलीप पाडगावकर हे मातीशी जोडलेले पत्रकार होते. 

दरम्यान, सध्याचा काळातले न्यूज चॅनेलवाले सगळ्यात आधी बातमी ब्रेक करण्यावर भर देत आहेत. मात्र ती बातमी सर्वप्रथम झळकवण्यापूर्वी तिची सत्यता, ती पूर्णपणे बरोबर, खरी स्वरूपात देण्यावर भर आपण देत नाहीत. सध्या पत्रकारितेतील मूल्ये जोपासणार्‍या पत्रकारांची गरज नसून स्टुडिओमध्ये बसून फक्त भाषण देणारे पत्रकार त्यांना लागतात असे दिलून येत आहे.  सनसनाटी, आरडाओरडा आणि एकमेकांवर बेछूट आरोप करणारे अनेक पत्रकार सध्या दिसत आहेत. स्टुडिओत बसून अशआ प्रकारची पत्रकारीता केल्याने रावण स्कूल ऑफ जर्नालिझम फोफावत आहे. यावेळी कार्यक्रमात  डॉ. शां. ब. मुजुमदार व डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आपल्या भाषणात पाडगावकरांच्या आठवणींना उजाळा दिला.