Wed, Mar 27, 2019 02:05होमपेज › Pune › सलग आठ सत्रांनंतर निर्देशांकात घसरण

सलग आठ सत्रांनंतर निर्देशांकात घसरण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे :प्र.तिनीधी

गेल्या सलग आठ सत्रांमधील भाववाढीनंतर अपेक्षेप्रमाणे मंगळवारच्या सत्रात नफारुपी व्यवहारांचे प्रमाण जास्त हाते. त्यामुळे बहुतेक सर्व प्रमुख कंपन्यांची भाव पातळी खाली घसरली. मुंबई शेअर निर्देशांक या सत्रात तब्बल 105 अंशांनी खाली घसरला व तर निफ्टीमध्येही 29 अंशांची घट झालेली होती.  या सत्रात प्रामुख्याने रिलायन्स, आयीआसयीआय बँक व इन्फोसिस यांच्यात लक्षणीय घसरण झालेल होती.

या सत्रामध्ये सकाळी मुंबई शेअर निर्देशांक 33 हजार 726.65 पातळीवर खुला झाला. त्याने दिवसभरात 33 हजार 770.15 अंशांची उच्चांकी पातळी तर 33 हजार 576.65 अंशांची निचांकी पातळी नोंदवलेली होती. दिवसअखेरीस हा निर्देशांक 105.85 अंशांनी खाली जाऊन 33 हजार 618.59 अंश पातळीवर बंद झाला.  त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजारावरील निफ्टी निर्देशांकात 29.30  अंशांची घट होऊन तो 10  हजार 370.25 अंश पातळीवर बंद झाला.  या सत्रात अ गटातील 341 कंपन्यांपैकी 149  कंपन्यांची भाव पातळी वरच्या पातळीवर गेली तर उर्वरित 188  कंपन्यांचे भाव  खाली घसरलेले होते. या सत्रात एकूण 2877 कंपन्यांमध्ये व्यवहार होऊन त्यातील 1386 कंपन्यांचे भाव वरच्या पातळीवर गेले तर 1333 कंपन्यांची घट  झाली.  केवळ 158  कंपन्यांचे भाव त्याच पातळीवर स्थिर राहीलेले होते. तसेच निफ्टीच्या 50 कंपन्यांपैकी 19  कंपन्यांचे भाव वरच्या पातळीवर गेले तर 31 कंपन्यांमध्ये घसरण नोंदवली गेली. या सत्रामध्ये अ गटातील सर्वाधिक म्हणजे                                                                                                                                                                                                                                    

 0.19 टक्के ते 1.48 टक्के इतकी वाढ  मारुती सुझुकी, एचडीएफसी व ल्यूपीन  या कंपन्यांमध्ये झाली. तसेच अ गटातील सर्वाधिक 0.22 टक्के ते 1.88  टक्के इतकी घसरण  इन्फोसिस, एनटीपीसी व टीसीएस  या कंपन्यांमध्ये झाली. या सत्रातील सर्वाधिक उलाढाल भारती एअरटेल  या  कंपनीमध्ये झाली. या कंपनीच्या  8 लाख 74  हजार 929 शेअर्समध्ये  43 कोटी  12  लाख रुपयांचे 1   हजार 270 व्यवहार झाले. या कंपनीने या सत्रात  500.45 रुपयांची उच्चांकी भाव पातळी तर 490.25 रुपयांची निचांकी पातळी नोंदवलेली होती. त्यापाठोपाठ पुढील कंपन्यांची या सत्रातील अनुक्रमे खुला ,उच्चांकी, निचांकी व बंद भाव पातळी पुढीलप्रमाणे - बँक ऑफ बडोदा 176, 176.25, 170.9 व 172.2 रुपये; स्टेट बँक 335.35, 336.25, 331.5 व 332.65 रुपये;