होमपेज › Pune › मालधक्का सुरू होण्याबाबत अनिश्‍चितता

मालधक्का सुरू होण्याबाबत अनिश्‍चितता

Published On: Dec 16 2017 2:20AM | Last Updated: Dec 16 2017 1:49AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

संगमब्रीज रेल्वेमार्गावर झालेले अतिक्रमण हटविल्यानंतर रेल्वे मार्गाची दुरुस्ती करण्यात येईल. त्यानंतरच मालधक्क्याचे कामकाज सुरू होईल, अशी भूमिका शुक्रवारी मध्य रेल्वेच्या पुणे विभाग प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे आता मालधक्का केव्हा सुरू होणार, याबाबत अनिश्‍चितता वाढली आहे.  रेल्वेच्या संगमब्रीज येथे असलेल्या मार्गावर मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. अनेक नागरिकांनी येथे बेकायदेशीरपणे पत्र्याच्या शेड टाकून झोपड्या उभारलेल्या आहेत. या झोपड्या रेल्वेरुळापासून दोन ते तीन फुटांच्या अंतरावर आहेत. त्यामुळे रेल्वेमालगाडी अगर इतर गाड्या शंटिग करण्यासाठी या भागात आल्यास अपघात होण्याची जास्त शक्यता आहे.

या रेल्वेमार्गावर जमिनीपासून केवळ 15 फूट उंचीवर झोपड्या उभारण्यात आलेल्या आहेत. यामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहेत. शिवाय रेल्वेमार्गाची दुरुस्ती तसेच देखभाल करणे प्रशासनास अवघड झाले आहे. या मार्गावर रेल्वे चालविल्यास अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन अतिक्रमण हटविल्याशिवाय कोणत्याही प्रकारची वाहतूक सुरू होणार नाही, अशी भूमिका रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या रेल्वेमार्गावरील अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे. त्यानंतर मालधक्क्यावरील कामकाज सुरू होईल. यामुळे मालधक्का केव्हा सुरू होईल, याबबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे.