Mon, Aug 19, 2019 04:56होमपेज › Pune › वीजग्राहकांनी एजंटांना थारा देऊ नये

वीजग्राहकांनी एजंटांना थारा देऊ नये

Published On: Jan 29 2018 1:45AM | Last Updated: Jan 28 2018 11:56PMपुणे : प्रतिनिधी 

 महावितरणला जाग

महावितरणमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार मंजुरी, नावात बदल आदींबाबतची प्रक्रिया सुटसुटीत करण्यात आली आहे. या कामांसाठी कोणत्याही स्वयंघोषित एजंटांना वीजग्राहकांनी थारा देऊ नये असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणच्या पुणे परिमंडलात वीजग्राहकांना नवीन वीज जोडणी यासह इतर कामांसाठी एजंटाकडे जाण्यास अभियंते आणि वायरमन जाण्यास भाग पाडतात. याबाबत ‘पुढारी’मध्ये सविस्तर बातमी प्रसिध्द करण्यातआली होती. त्यानुसार  महावितरणने प्रसिध्दि पत्रक काढून वीज ग्राहकांना जागृत राहण्याचे आवाहन केले आहे. 

वेबसाईट किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय वेबसाईटवर नवीन वीजजोडणीचा एक पानी अर्ज उपलब्ध आहे व लागणारी आवश्यक कागदपत्रे व महत्वाचे म्हणजे वीजजोडणीसाठी लागणार्‍या  शुल्काची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. ऑनलॉईन किंवा अर्ज भरून दाखल केलेल्या नवीन वीजजोडणीची महावितरण अंतर्गत प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाईन करण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्ज दाखल केल्यानंतर त्याची स्थिती  ग्राहकांना स्वतः वेबसाईटवर पाहता येते किंवा महावितरण कार्यालयातून त्याबाबत माहिती घेता येते.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरांत एक खिडकी ग्राहक सुविधा केंद्रात वीजजोडणीबाबतच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती अर्जांसह उपलब्ध आहे. नवीन वीजजोडणी, वीजभार मंजुरी, नावांत बदल आदींच्या विविध सेवांसाठी पद्मावती, रास्तापेठ, नगररोड, पर्वती व बंडगार्डन विभागातील ग्राहकांनी रास्तापेठ येथील ग्राहक सुविधा केंद्गात तसेच कोथरूड विभागातील ग्राहकांनी एसएनडीटी कॉलेजजवळील ग्राहक सुविधा केंद्गात, शिवाजीनगर विभागातील ग्राहकांनी चतुश्रृंगी मंदिरासमोरील ग्राहक सुविधा केंद्गात तर पिंपरी, भोसरी विभागातील ग्राहकांनी पिंपळे सौदागर येथील ग्राहक सुविधा केंद्रात संपर्क करू शकतात. अशी  सुविधा उपलब्ध  करून दिलेली आहे.त्यामुळे वीजग्राहकांना कोणत्याही स्वयंघोषित एजंटांकडे जाण्याची कुठलीही आवश्यकता नाही.