Sun, Apr 21, 2019 05:49होमपेज › Pune › ‘एकवीरा’ कळसचोरी प्रकरण : तपास वेळप्रसंगी ‘सीआयडी’कडे

एकवीरा कळसचोरी प्रकरण : तपास वेळप्रसंगी ‘सीआयडी’कडे

Published On: Dec 20 2017 2:38AM | Last Updated: Dec 20 2017 2:37AM

बुकमार्क करा

पुणे ः देवेंद्र जैन

एकवीरा देवी मंदिराच्या कळसचोरी प्रकरणाचा येत्या दि. 25 पर्यंत पोलिसांकडून तपास न झाल्यास पुढील तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्यात यावा; तसेच मंदिराच्या विश्‍वस्तांना वाळीत टाकणार्‍यांवर त्वरित गुन्हा दाखल करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पोलिस अधीक्षक सुवेज हक यांना दिले. 

शिवसेनेच्या आमदार नीलम गोर्‍हे यांनी दि. 8 डिसेंबर रोजी ‘दै. पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचा संदर्भ देत हिवाळी अधिवेशनात पोलिस तपासाबाबत प्रश्‍न उपस्थित केले होते. त्याचबरोबर मंदिराच्या विश्‍वस्तांना वाळीत टाकण्याच्या प्रकाराचा त्यांनी या वेळी उल्लेख केला होता. याची गंभीर दखल घेऊन सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी यासंदर्भात तातडीची बैठक घेण्याच्या सूचना गृहराज्यमंत्र्यांना केल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी नागपूर येथील विधानभवनात एकवीरा देवी मंदिराच्या कळस चोरीप्रकरणी विशेष बैठक घेण्यात आली. या वेळी  एकवीरा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, माजी आमदार अनंत तरे उपस्थित होते. 

या वेळी दीपक केसरकर यांनी पोलिस तपासाबाबत नाराजी व्यक्त करीत सहायक पोलिस निरीक्षक साधना पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले.त्याचबरोबर विश्‍वस्तांना वाळीत टाकणार्‍यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावे, असेही त्यांनी या  वेळी सांगितले.