Fri, May 24, 2019 08:27होमपेज › Pune › लाच ‘दराडे मॅडम’च्या  सांगण्यावरून स्वीकारली

लाच ‘दराडे मॅडम’च्या  सांगण्यावरून स्वीकारली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

शिक्षण हक्‍क कायदा (आरटीई)अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शासनाकडून मिळणारे अनुदानाचे बिल मंजूर करून रक्‍कम अदा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कार्यालय अधीक्षक शिल्पा मेनन 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली होती. मेनन हिच्याकडे तपासात तिने ही लाच ‘दराडे मॅडम’ म्हणजेच जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांच्या सांगण्यावरून स्वीकारली असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबीला) दिली आहे. याप्रकरणी मेनन हिला विशेष न्यायाधीश दिलीप  मुरूमकर यांनी 2 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सांगवी येथील नॅशनल इंग्लिश स्कूल कार्यालयात अधीक्षक शिल्पा सुरेश मेनन (वय 45, रा. फ्लॅट नं. 203, रेणुका हेरिटेज, पर्वती) आणि क्लार्क महादेव मच्छिंद्र सारुख (वय 47, रा़  यशवंतराव चव्हाणनगर बिल्डिंग नं़  क/38 डहाणूकर कॉलनी, कोथरूड) यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदार यांची शिक्षण संस्था असून, त्यांच्या शिक्षण संस्थेत आरटीई (शिक्षण हक्‍क कायदा) अंतर्गत शिकणार्‍या मुलांचे अनुदान शासनाकडून मिळते़  शासनाचे हे अनुदान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत मंजूर केले जाते़

 त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अनुदानाचे 17 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्याचे काम शिल्पा मेमन यांच्याकडे होते़  हे बिल मंजूर करून ती रक्‍कम देण्यासाठी मेमन यांनी दीड लाख रुपयांची (10 टक्के) लाच मागितली होती; परंतु, लाच देणे मान्य नसल्याने याबाबत तक्रारदारांनी एसीबीकडे धाव घेतली होती. मेनन आणि  सारूक या दोघांना 50 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक झाली. दोघांना शुक्रवारी दुपारी शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. 

मेनन हिने तक्रारदारांकडे दीड लाखांची मागणी केलेली होती. सापळा रचण्याच्या दिवशी झालेल्या संभाषणात त्यांनी साहेबांचा फोन आला होता, तुमचे बिल 22 लाखापर्यंत गेले आहे असे ध्वनिमुद्रित झाले आहे. साहेब म्हणजे नक्‍की कोणते साहेब, त्यांचा गुन्ह्यात खरोखरच सहभाग आहे का? याबाबत दोघांकडे तपास करायचा आहे. मेनन हिने लाचेची रक्‍कम ‘मी दराडे मॅडम’च्या सांगण्यावरून स्वीकारण्यास गेले असल्याचे ‘एसीबी’ला सांगितले आहे. या गुन्ह्यात त्यांचा खरोखर सहभाग आहे का? याबाबत त्यांच्याकडे तपास करायचा आहे. लाचेची रक्‍कम ही मोठी असून, त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याबाबत तपास करायचा आहे.

आरोपी लोकसेवक यांनी नजीकच्या कालावधीतील केेलेली कामे व रेकॉर्ड तपासून आणखी कोणाकडून लाच स्वीकारली आहे. याबाबतचाही तपास करणे आवश्यक आहे. मेनन आणि सारूक या दोघांच्याही आवाजाचे नमुने घेणे आवश्यक असल्याने दोघांच्याही पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने ती मान्य केली. पोलिस निरीक्षक अरुण घोडके तपास करीत आहेत.
 

 

 

tags ; pune,news,education under RTE Students approved government grant bill


  •