Fri, Jul 19, 2019 13:52होमपेज › Pune › पुण्यात पाहिले महिलांसाठीचे ई टॉयलेट सुरु

पुण्यात पाहिले महिलांसाठीचे ई टॉयलेट सुरु

Published On: Jul 17 2018 4:58PM | Last Updated: Jul 17 2018 4:58PMपुणे : प्रतिनिधी 

लायन्स क्लब ऑफ़ पुणे गणेशखिंड आणि रोटरी क्लब यांच्या प्रयत्नाने महिलांसाठी डेक्कन कॉर्नर जवळील लकड़ीपुलाच्या बाजूला ई टॉयलेट बसवण्यात आले आहे. असे एकूण 10 टॉयलेट शहरातील गर्दीच्या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत. 1 रूपयाचा कॉइन टाकून या सेवेचा लाभ महिलाना घेता येणार आहे. याशिवाय सॅनिटरी नैपकिन व्हेन्डिंग मशिनही बसवण्यात आले आहेत. पाच रूपये कॉइन टाकून ते मिळवता येणार आहेत. या ई टॉयलेटचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. लायन्स,रोटरी सारख्या संस्था आणि प्रशासन एकमेकांच्या साथीने शहराचा विकास साधु शकतात असे त्या यावेळी म्हणाल्या.