Tue, Jul 23, 2019 10:30होमपेज › Pune › डीएसकेंसह इतरांना अटकपूर्व जामीन मंजूर

डीएसकेंसह इतरांना अटकपूर्व जामीन मंजूर

Published On: Jan 04 2018 2:04AM | Last Updated: Jan 04 2018 1:25AM

बुकमार्क करा
पुणे ः प्रतिनिधी 

फसवणूक आणि महाराष्ट्र ओनर्सशिप फ्लॅट अ‍ॅक्टनुसार (मोफा) डीएसकेंसह इतर पाच जणांविरूद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी अटी, शर्तींवर हा जामीन मंजूर केला आहे.     कुलकर्णींसह सहा जणांंविरुद्ध (मोफा) कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी अटकपूर्व जामीन अर्जास विरोध केला. कुलकर्णी यांनी गृहप्रकल्पासाठी बँकेकडून कर्ज घेतले आणि ग्राहकांकडूनही त्यांनी रक्कम घेतली आहे. त्यांच्याकडे एकूण तेराशे कोटी रुपये त्यावेळी होते.

कायद्यानुसार या गृहप्रकल्पातील ग्राहकांना 2016 मध्ये सदनिकांचा ताबा मिळणे अपेक्षित होते. ग्राहकांकडून त्याने तब्बल 620 कोटी रुपये घेतले आहेत. अशा ग्राहकांना सदनिकांचा ताबा मिळणे आवश्यक होते. परंतु, ग्राहकांना अद्यापही सदनिकांचा ताबा मिळाला नाही. पैसा असूनही बांधकाम पूर्ण का झाले नाही, पैशाचे काय केले अशा विविध मुद्यांचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे, असे खान यांनी न्यायालयात सांगताना अटकपूर्व जामीन फेटाळण्याची मागणी केली होती. कुलकर्णी यांच्यातर्फे अ‍ॅड. श्रीकांत शिवदे यांनी बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाने कुलकर्णी यांना अटकपूर्व जामीन दिला असून, आम्ही गुंतवणूकदारांचे पैसे देण्यास तयार असल्याचे नमूद करताना अटकपूर्व देण्याची मागणी केली होती. बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह धरून डीएसकेंसह इतरांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, सरकार पक्षाने डीएसकेंच्या उपस्थितीत अटकपूर्व जामिनावरील निर्णय देण्यात यावा, असा मागणी करणारा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.