Fri, Apr 19, 2019 12:20होमपेज › Pune › आयुष डॉक्टरांच्या पदोन्नतीसाठी समिती

आयुष डॉक्टरांच्या पदोन्नतीसाठी समिती

Published On: Jan 06 2018 1:40AM | Last Updated: Jan 05 2018 11:53PM

बुकमार्क करा
पुणे ः प्रतिनिधी

राज्य आरोग्य सेवेत कार्यरत असणार्‍या आयुष पदवीधर डॉक्टरांना वैद्यकीय अधिकारी, कार्यक्रम व्यवस्थापक याव्यतिरिक्त  सध्या मोठ्या हुद्यावर प्रमोशन मिळत नाही. पण त्यांना आरोग्य अधिकारी, सहसंचालक, उपसंचालक व संचालक पदावर पदस्थापना देण्यात यावी की नाही याचा विचार सुरू झाला आहे. त्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली असून त्याचा एका महिन्यात निर्णय होणार आहे. आरोग्य सेवा व राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत अनेक आयुष पदवीधर डॉक्टर राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेतील कार्यरतआहेत. राज्यात तर आरोग्य सेवा गट - अ मध्ये एकुण पदांपैकी 33 टक्के पदे हे तर आयुष डॉक्टरांद्वारे भरण्यात येतात. सध्या सार्वजनिक आरोग्य विभागात स्थायी व अस्थायी कार्यक्रमांतर्गत दोन हजार वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.

तसेच राष्ट्रीय कार्यकमांतर्गत 650, आरबीएसके अंतर्गत 1750 असे पदवीधर व शिकाउ डॉक्टर कार्यरत आहेत. सध्याच्या नियमानुसार आयुष डॉक्टरांना वैद्यकीय अधिकारी व त्या संवर्गात बढती देण्यात येते. पण या पदवीधर डॉक्टरांचे सुसूत्रीकरण होण्यासाठी व लोकांना मोठ्या प्रमाणात लाभ देण्यासाठी संरचना करणे आवशक आहे. त्यानुसार मुंबईतील पोद्दार आयुर्वेदिक कॉलेजचे विभागप्रमुख डॉ. श्रीराम सावरीकर यांच्या अध्यक्षतेखाली 19 सदस्याची समिती स्थापन करण्यात आली आहे.