Wed, Apr 24, 2019 20:15होमपेज › Pune › 'लग्न मुबारक' वरून वाद; आवाम विकास पार्टीचा गोंधळ

'लग्न मुबारक' वरून वाद; आवाम विकास पार्टीचा गोंधळ

Published On: May 03 2018 5:08PM | Last Updated: May 03 2018 5:07PMपुणे : प्रतिनिधी

लग्न मुबारक या सागर पाठक दिग्दर्शित मराठी चित्रपटाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदे दरम्यान आवाम विकास पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालत चित्रपटाच्या पोस्टरला काळे फासले. 

याबाबत आवाम विकास पार्टीचे पश्चिम विभाग प्रमुख अश्रफ वानकर यांनी पुढारी ऑनलाईनशी बोलताना या आंदोलना बाबत भूमिका विशद केली. चित्रपटात असलेले आक्षेपार्ह विधान गाळावे, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आम्हास दाखविण्यात यावा या मागण्या आंदोलन कर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आवाम विकास पार्टीचे पश्चिम विभाग प्रमुख अश्रफ वानकर यांनी दिला.

या संदर्भात चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकार यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक सागर पाठक म्हणाले, या चित्रपटामध्ये कोणत्याही दोन समाज घटकांमध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचा कोणताही आशय नाही. ‘लग्न मुबारक’ मुळे सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, अशी ग्वाही मी देतो. यावेळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे, अभिनेता सिद्धांत मुळे, निर्माते अजिंक्य जाधव, गौरी पाठक उपस्थित होते.