Wed, Apr 24, 2019 12:04



होमपेज › Pune › निराशा करणारा अर्थसंकल्प : अशोक चव्हाण

निराशा करणारा अर्थसंकल्प : अशोक चव्हाण

Published On: Feb 01 2018 4:46PM | Last Updated: Feb 01 2018 4:49PM



पुणे : प्रतिनिधी

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लोकसभेत सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांची मालिका आणि घोषणांचा पाऊस आहे. अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. 

अर्थसंकल्‍पावर बोलताना अशोक चव्हाण यांनी या अर्थसंकल्‍पामध्ये अंमलबजावणीचा रोडमॅप दिसत नसल्‍याचे म्‍हंटले आहे. तसेच मोठमोठे आकडे सांगून प्रत्यक्षात लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केल्‍याचे म्‍हंटले आहे. यावेळी हा अर्थसंकल्प म्‍हणजे सर्वसामान्यांवर कराचा बोजा टाकणारा, महागाई वाढवणारा तसेच जनतेची निराशा करणारा असे त्यांनी ट्विट करून  अर्थसंकल्पवर टीका केली.

Image may contain: text