Wed, May 22, 2019 22:20होमपेज › Pune › डी. एस. कुलकर्णी दाम्पत्याची रवानगी येरवड्यात

डी. एस. कुलकर्णी दाम्पत्याची रवानगी येरवड्यात

Published On: Mar 03 2018 1:45AM | Last Updated: Mar 03 2018 1:20AMपुणे : प्रतिनिधी  

शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणी डीएसके उर्फ दीपक कुलकर्णी व यांच्या पतक्ी हेमंती कुलकर्णी यांना 14 दिवसांची न्यायालीन कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी हा आदेश दिला आहे.  दरम्यान दीनानाथ रूग्णालयामध्ये उपचार देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आवश्यकता भासल्यास सर्वोतपरी वैद्यकीय मदत देण्याचे येरवडा कारागृह निरीक्षकास आदेश देण्यात आले. ठाणे येथील भागीदारी सोडण्यात आल्याने 6 कोटी 55 लाख रूपये मिळणार असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. पोलिस कोठडी संपल्यानंतर डीएसके यांना गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

पोलिस कोठडी दरम्यान डीएसके यांना आवश्यक वस्तू पुरवल्या गेल्या नाहीत, त्यांची तब्येत बिघडली असताना देखील थंड पाण्याने आंघोळ करण्यास पोलिसांनी भाग पडल्याची माहिती त्याचे वकील श्रीकांत शिवदे यांनी न्यायालयाला दिली. दरम्यान मला मरण्यापूर्वी ठेवीदारांचे पैसे परत करायचे आहेत, म्हणताना डीएसके यांना रडू कोसळले. यावर न्यायालयात उपस्थित असणार्‍या तक्रारदारांनी डीएसके हे नाटक करत असून यापूर्वी अनेक वेळा स्वतःला थापड, जोडे मारून घेण्याचेे नाटक करतात. त्यांच्या नाटकी रडण्यावर विश्‍वास ठेवू नये, त्याच्यावर दया दाखवत असेल तर आमच्यासारख्या ज्येेष्ठ नागरिकांवर देखील दया दाखवा अशी विनवणी केली.

न्यायालयाने गुंतवणूकदारांचे हित महत्वाचे आहे, त्या दृष्टीने न्यायालय भूमिका बजावेल अशी ग्वाही दिली.  बचाव पक्षांनी सरकारी वकिलांना जुन्या दाखल्याचा संदर्भ देत सरकारी रूग्णालये चांगली सेवा देत नसल्याचे सांगितले. जुना संदर्भ  दाखविल्याबद्दल बचाव पक्षाचे म्हणणे खोडून काढतांना 90 मध्ये आपण गोट्या खेळत होतो, आता आपण मोबाईल खेळत असल्याचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी सांगितले.