Thu, Jul 18, 2019 16:33होमपेज › Pune › तीन रस्ते रुग्णवाहिकांसाठी ठरताहेत डेंजर झोन

तीन रस्ते रुग्णवाहिकांसाठी ठरताहेत डेंजर झोन

Published On: Dec 12 2017 2:08AM | Last Updated: Dec 12 2017 12:04AM

बुकमार्क करा

ज्ञानेश्‍वर भोंडे

पुणे ः सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता आणि टिळक रस्ता या तीन रस्त्यांवर अधिक रहदारी असल्याने येथे रुग्णवाहिकांना सर्वाधिक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यातील टिळक रोडला पर्यायी रस्ते आहेत; पण सिंहगड रस्ता आणि कर्वे रस्त्याला पर्याय नसल्याने हे रस्ते रुग्णवाहिकांसाठी डेंजर झोन ठरत आहेत.  पुणे शहरात रुग्णवाहिका चालकांच्या दोन संघटना आहेत. त्यामध्ये ‘पुणे शहर व जिल्हा अ‍ॅम्ब्युलन्स असोसिएशन’ या संघटनेचे 150 सभासद आहेत; तर दुसरी ‘पुणे अ‍ॅम्ब्युलन्स असोसिएशन’ असून त्यांचे 500 सभासद आहेत. अशा प्रकारे  पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून सुमारे साडेसहाशे रुग्णवाहिका आहेत.

सिंहगड रस्त्यावर सिंहगड रस्ता परिसर, हिंगणे, धायरी, नर्‍हे हा परिसर येतो; तर कर्वे रस्त्यावर कोथरूड, कर्वेनगर, वारजे, माळवाडी हा परिसर येतो. मात्र या दोन्ही रस्त्यांना पर्यायी रस्ता नसल्याने रुग्णवाहिकांना त्या रस्त्यांवरूनच जाणे भाग पडते. या रस्त्यांवर सकाळी आणि सायंकाळी  वाहतूक कोंडी होत असल्याने रुग्णवाहिकांचा श्‍वास गुदमरत असल्याची माहिती सह्याद्री हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेचे प्रमुख ज्ञानेश्‍वर पर्‍हाड यांनी दिली. मयाआधी संचेती पूल येथे कोंडी होत होती; पण आता तेथे उडडाणपूल झाल्याने ही कोंडी फुटली असल्याचेही त्यांनी सांगितले.