होमपेज › Pune › मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 10 2018 12:50AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या विविध निर्णयांची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना दिले होते. मात्र, अद्याप एकाही चौकशीचे पत्र महापालिकेला मिळालेले नाही. त्यामुळे निर्णयांची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल ठरले असून चौकशीचे आश्वासन हे इतर घोषणांसारखी एक घोषणाच ठरली आहे. 

सत्ताधारी आमदारांनीच पालिकेच्या स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभामार्फत घेण्यात आलेल्या निर्णयावर ताशेरे ओढत विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केले होते. यामध्ये स्थायी समितीने पावसाळ्याअगोदर करण्यात आलेली नालेसफाईच्या निविदांची चौकशीची मागणी, शहरातील कचरा वाहतुकीसाठी तीनपट दराने निविदा काढण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी करावी, पालिका शाळांमध्ये ई-लर्निंग प्रकल्प राबवण्यासाठी काढण्यात आलेली निविदा नियमबाह्य आहे, या सर्व निर्णयांसह पालिकेच्या प्रभारी आरोग्यप्रमुख वैशाली जाधव यांची चौकशी करण्याची मागणी नागपूर हिवाळी विधिमंडळात करण्यात आली होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी यासंदर्भात चौकशीचे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.
हिवाळी अधिवेशनाला आता 15 दिवसांचा कालावधी उलटला आहे. अद्याप पालिकेकडे कोणत्याच चौकशीसाठी पत्र आलेले नाही. महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार अद्याप एकाही चौकशीचे पत्र पालिकेला मिळाले सल्ल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.