Sat, Sep 22, 2018 09:33होमपेज › Pune › राज्यात थंडी आणखी वाढण्याची शक्यता

राज्यात थंडी आणखी वाढण्याची शक्यता

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:36AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

गेल्या 4-5 दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश शहरांतील किमान तापमानात घट होत आहे. त्यामुळे राज्यात थंडीने कहर केला आहे. येत्या काही दिवसांत थंडी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शनिवारी जळगावात सर्वात कमी 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जेव्हा हवेचा दाब वाढतो, तेव्हा किमान तापमानात घट होऊन थंडीत वाढ होते. उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भातील बहुतांश शहरांतील तापमान 8 ते 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरणार आहे. प्रमुख शहरांत शनिवारी नोंदविण्यात आलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः
 पुणे : 10.1, जळगाव : 9.4, कोल्हापूर : 16.1, महाबळेश्‍वर : 13.9, सातारा : 11.8, रत्नागिरी : 17.4, नांदेड : 11.0, अकोला : 12.4, अमरावती : 14.4.